अबू आझमीवर कारवाई कराच पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या कारवाईचा काळ ही वाढवला पाहिजे, सरकारच्या या कारवाईला आमचा पाठिंबा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांवर सरकार का कारवाई करत नाही असा सवालही यावेळी उपस्थित केला.

अबू आझमी यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, औरंगजेब नालायक होता, त्याचे आणि अबू आझमी यांच्या वक्तव्याचे समर्थन कोणी करू शकत नाही. अबू आझमी यांच्यावर सरकारने कारवाई करावी, त्याला आमचे समर्थन आहे. फक्त याप्रकरणी ठेका फक्त तुम्ही घेतला का? असा सवाल ही उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही? असा सवाल करत यांना कोणाचा राजाश्रय आहे असा संतप्त सवालही उपस्थित केला.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणीही केला तर कारवाई झालीच पाहिजे. यावर विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही विरोधकांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, फिक्सिंग काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *