तुषार गांधी यांचा इशारा, देशद्रोह्यांना उघडं पाडण्याचा निर्धार कायम, आरएसएस म्हणजे विष केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका

मागील काही काळात संपूर्ण देशभरातच धार्मिक तणाव वाढीस लागला आहे. त्यातच यातील अनेक प्रकरणांच्या मुळांची सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाची मातृसंस्थाच जबाबदार असल्याचे पाह्यला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे नातू ततुथा गांधीवादी विचारांचे तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवर संघाच्या निषेधाला न घाबरता टी करताना म्हणाले की, देशद्रोह्यांना उघडं पाडण्याचा निर्धार आपला बळकळ आहे. तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजे विष असल्याची टीका केली.तु

तुषार गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “त्यांना मी जे बोललो त्याबद्दल माफी मागावी अशी त्यांची इच्छा होती,” असेही यावेळी स्पष्ट केले. शुक्रवारी कोचीजवळील अलुवा येथील युनियन ख्रिश्चन कॉलेजला महात्मा गांधींच्या भेटीच्या शताब्दी समारंभात ते बोलत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी आरएसएसला “विष” म्हटले होते त्या त्यांच्या विधानाचा संदर्भ देत होते.

तुषार गांधी पुढे बोलताना म्हणाले की, त्यांना मी माझे विधान मागे घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. मी म्हटले होते की मी ते करत नाही. जेव्हा मी हे बोलतो तेव्हा मला माफी मागावी किंवा विधाने मागे घ्यावी असे वाटत नाही. या घटनेने देशद्रोह्यांना उघड करत राहण्याचा माझा निर्धार बळकट केला आहे. कारण हा एक लढा आहे जो स्वातंत्र्यलढ्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. आता, आपला एक समान शत्रू आहे. त्यांना उघड केले पाहिजे. ”

बुधवारी तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेयट्टिंकारा येथे एक प्रसिद्ध गांधीवादी दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना, तुषार गांधी म्हणाले की, आपण भाजपाला पराभूत करू शकतो, परंतु आरएसएस विष आहे. ते देशाच्या आत्म्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला त्याबद्दल भीती वाटली पाहिजे कारण जर आत्मा हरवला तर सर्व काही हरवले असेही यावेळी सांगितले.

या वक्तव्यामुळे भाजपा तसेच त्यांच्या वैचारिक मार्गदर्शक, आरएसएसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि रस्ता रोको करून तुषार गांधी यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि विरोधी काँग्रेस या दोघांनीही निदर्शनांचा निषेध केला.

शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात पुढे बोलताना तुषार गांधी म्हणाले की, त्यांना काळजी होती की “त्यांच्या आजोबांच्या खुन्यांच्या वंशज” आता त्यांच्या पुतळ्याच्या मागे येतील. “मला खरोखर काळजी वाटते. ते माझ्या पणजोबांच्या पुतळ्यावर गोळीबार करतील का कारण ते नेहमीचे गुन्हेगार आहेत?

आरएसएस-भाजपाच्या निदर्शनांचा निषेध करताना केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी याला देशाच्या धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवरील हल्ला असल्याचे सांगत हे निंदनीय आहे. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी कृती मान्य केली जाऊ शकत नाही. अशा प्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर आणि लोकशाही कारवाई केली जाईल… या घटनेवरून असे दिसून येते की निदर्शकांची मानसिकता गांधीजींची हत्या करणाऱ्यांपेक्षा वेगळी नाही. धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजातून तीव्र निषेध व्यक्त झाला पाहिजे, असेही सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन म्हणाले की ही घटना “महात्मा गांधींचा अपमान” आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी या घटनेविरुद्ध कठोर कारवाई करावी. तुषार गांधीच्या शब्दात काहीही चूक नाही की आरएसएस हा देशाच्या आत्म्यावर पसरलेला कर्करोग आहे. फॅसिझम देशावर राज्य करत आहे. तो देशाच्या आत्म्याला खात आहे. सत्य सांगितल्याबद्दल तुषारचा अपमान करण्यात आला, असा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

इराणचा इशारा, हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल लक्ष्य राहणार सरकार विरोधात इराणमधील निदर्शनात वाढ

इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या लाटेदरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यास, अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचा इरारा इराणने दिला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *