ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दादर येथील कै.भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

दिवंगत आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री ॲड.आशिष शेलार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री संजय शिरसाट, मुंबई महानगरपालिका महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार महेश सावंत, मुंबई महानगर पालिका उपमहापौर संजय घाडी, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, चाहते तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी अखेरचे दर्शन घेत पुष्पचक्र वाहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

तत्पूर्वी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठविण्यात आलेले पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अर्पण केले.

सोमवारी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत दिवंगत आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे, आमदार मिलिंद नार्वेकर विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत तसेच चाहत्यांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

 

About Editor

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *