राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप करून या …
Read More »एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर जलिल यांचे आरोप
छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, जे व्हेनेझुएलामध्ये घडले ते भारतात घडेल का? एका वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला सवाल
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘अपहरण’ करू शकतात का, असा सवाल उपस्थित केल्याने एका नव्या वादाला सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या शुल्कांवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन भाजपा महायुतीच्या हुकूमशाही व ठोकशाहीला धडा शिकवा भाजपाला वाजपेयी, मुंडे, महाजन, हेगडेवार व गोळवलकरही नको आहेत, रेशीमबागेत मोदी व शाहांचा फोटो बसवतील
राज्यातील २८८ नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला कौल मिळाला असून ४१ नगराध्यक्षांसह १००६ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगरसेवकांच्या २ हजार जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरपालिका निवडणुकीतील हा झंझावात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसेल असा विश्वास व्यक्त करत लोकशाहीविरोधी भाजपा महायुतीच्या हुकूमशाही व ठोकशाहीला जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »इराणमधील तणावपूर्ण स्थिती ; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायजरी केली जारी
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही …
Read More »पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व सुरेश कलमाडी काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. सुरेश कलमाडी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सुरेश कलमाडी यांनी भारतीय वायुसेनेतल्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाकडून उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाही इमाम आणि खालिद वगळता पाच जणांना जामिन मंजूर
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारला. २०२० च्या दिल्ली दंगलीच्या मोठ्या कटाच्या प्रकरणात त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हे दाखल आहेत. तथापि, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारीया यांच्या खंडपीठाने इतर पाच आरोपी – गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, …
Read More »सचिव तुकाराम मुंढे यांचे आदेश, दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करा बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई
दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड …
Read More »नरहरी झिरवळ यांची माहिती, प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटींचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा …
Read More »प्रताप सरनाईक यांचा दम, एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई
सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा …
Read More »
Marathi e-Batmya