Breaking News

सेरोप्रिव्हेलन्स संशोधनानुसार १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आवश्यक दोन डोस घेतलेल्या व्यक्तीमध्ये अँटिबॉडीज सेरोप्रिव्हेलन्सचं प्रमाण ९२ टक्के, तर लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये फक्त ६८ टक्के

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणी संशोधनाबाबत लोकसंख्या/समुदायातील प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्स अभ्यास महत्त्वाचा आणि आवश्यक होता. SARS-CoV-2 संसर्ग, संसर्गासाठी लोकसंख्या आधारित निर्देशक आणि साथीच्या रोगांवर सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी समुदायाच्या प्रतिसादाचे मोजमाप करण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्सचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरिता आयसीएमआर या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून …

Read More »

काँग्रेसच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता, कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजार रू. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : प्रतिनिधी कोविड काळात मृत्यूमुखी पावणाऱ्यांच्या वारसांना मदत काय देणार असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केल्यानंतर त्या वारसांना ५० हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाही मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्राने राज्याला पत्र पाठविल्यानंतर ५० हजार ही फारच तुटपुंजी रक्कम असून त्याऐवजी ४ लाख रूपयांची …

Read More »

निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर पहिल्या टप्प्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार

पुणे: प्रतिनिधी राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. कोविड-19 परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका …

Read More »

पटोले केंद्रीय मंत्री राणेंना म्हणाले, नवीन कुडमुडे ज्योतिष्यी… भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार!: नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना …

Read More »

परमबीर सिंग चांदिवाल आयोगासमोर हजर राहणार ठाणे, एस्पप्लेंनेंड न्यायालयासमोर हजेरी

मुंबईः प्रतिनिधी तब्बल २५० दिवसाहून अधिक काळ गायब झालेले परमबीर सिंग यांनी काल हजेरी लावत ठाणे गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ठाणे न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या विरोधात पुन्हा न्यायालयात हजर होत सदरचे वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यावर ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केल्यानंतर त्यांनी …

Read More »

स्वस्तात घर खरेदीची संधी, पीएनबी करणार लिलाव ई-ऑक्शनद्वारे स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी

मुंबईः प्रतिनिधी तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. पीएनबी या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. २६ नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातात. पीएनबीने …

Read More »

सुरक्षा यंत्रणा सरकारच्या वेठीला, मुंबईकर वाऱ्यावर ! सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम ठाकरे सरकारने रखडवली-भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मंत्र्यांच्या सरबराईसाठी ठाकरे सरकारने पोलीस यंत्रणेस वेठीस धरल्याने राज्यातील जनतेची सुरक्षा संकटात सापडली आहे. दहशतवादी कारवायांचे अनेक कट केंद्रीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येऊनही, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात मात्र ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून …

Read More »

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा फटका बाजार १४०० अंकानी कोसळला

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे शुक्रवारी देशातील शेअर बाजारात हाहाकार माजवला. सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटले.BSE सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला. यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. सकाळी सेन्सेक्स ५४०.३ अंकांच्या घसरणीसह ५८,२५४.७९ वर उघडला. त्यानंतर ही घसरण तब्बल १,४८८ अंकांपर्यंत गेली. दुसरीकडे, निफ्टीमध्येही आतापर्यंत ४४८.०५ …

Read More »

गौतम अदानी आणि मुकेश अंबानींची बरोबरी दोघांकडे ६.६३ लाख कोटी रुपयांची संपत्ती

मुंबई: प्रतिनिधी अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आता मालमत्तेच्या बाबतीत समान पातळीवर आहेत. दोघांची मालमत्ता ६.६३-६.६३ लाख कोटी रुपये आहे. डॉलरमध्ये ती ८९ अब्ज डॉलर आहे. दोन बिझनेस टायकून आता आशियातील सर्वात श्रीमंत आणि समान पातळीवर आहेत. बुधवारी अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल …

Read More »

परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचे सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिद्ध चौकशी सीबीआय कडे सोपवा- आ. अतुल भातखळकर

मुंबई प्रतिनिधी परमवीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगून टाकले, त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा माझा आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचा दावा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर …

Read More »