Breaking News

खाजगी रूग्णालयानों रूग्णांना बेड नाकारताय, BMC वॉच करतेय पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. तर …

Read More »

७३४ रिक्त पदे भरा, अन्यथा प्रशासनाने कामाची अपेक्षा करू नये शिधावाटप कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई/ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी/अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करून …

Read More »

खुषखबर ! पुण्यात होणार पहिल्यांदा ३० माकडांवर कोरोना लसची चाचणी माकड राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपूर्द-वनमंत्री संजय राठोड

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड – 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग …

Read More »

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष रहावे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्या वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. रेल्वेची वाहतूक …

Read More »

बॉम्बे, जसलोक, हिंदुजा आणि लिलावती हॉस्पीटला सरकारकडून नोटीसा मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या अचानक भेटी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. या भेटी दरम्यान बॉम्बे, जसलोक, हिंदुजा …

Read More »

७० पैकी ३० हजारापेक्षा जास्त घरी गेले, तर ३७ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण २३६१ नवे रूग्ण, तर ७६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज नव्याने २ हजार ३६१ रूग्ण आढळून आले आहे. तर ७६ जणांचा मागील २४ तासात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारावर पोहोचली असून यापैकी ३० हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ३७ हजार ५३४ रूग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश …

Read More »

५३ हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरूच राहणार नामांकित शाळेतील प्रवेशाची योजना बंद नव्हे तर तात्पुरती स्थगिती दिल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोवीड 19 च्या साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व आर्थिक काटकसरीच्या धोरणामुळे आदिवासी समाजातील मुलांसाठी नामांकित इंग्रजी शाळेतील प्रवेशास आदिवासी विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असली तरी या मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या इतर इंग्रजी माध्यमाच्या …

Read More »

विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचाय, १२ तासासाठी टीव्ही तर २ तासासाठी रेडिओ द्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे केंद्राला पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन शाळा सुरु होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या दूरदर्शनच्या दोन चॅनेलवरवरील १२ तास आणि आकाशवाणी रेडियोवरील २ तासाचा वेळ शिक्षण देण्यासाठी द्यावा अशी शालेय …

Read More »

ATKT असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? आम्हाला अशा नव्या बिरुदावलीने तर ओळखले जाणार नाही ना? ATKT असलेल्या ४०% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले …

Read More »

ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांसाठी रूग्णालय- बेड हवय, मग एक क्लीक करा महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित

ठाणे: प्रतिनिधी ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 रूग्णांना महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी www.covidbedthane.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आले आहे. शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि …

Read More »