मुंबईः प्रतिनिधी कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. …
Read More »बुलेट ट्रेन रद्द करून त्याचा निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन
ठाणेः प्रतिनिधी दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे प्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरुन रेल्वेत चढलो तरी जीवंत परत येऊ का? अशी धाकधूक प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पुल आणि रस्त्यांवरील पुल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारत नाही. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी …
Read More »दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य
औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …
Read More »लोकसभा निवडणुकीत महिलांची मते निर्णायक ठरणार महिला मतदारांचा टक्का वाढला
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची …
Read More »मेट्रो ४ अंडरग्राऊंड करा ठाणेकरांनी केली मागणी
ठाणे: प्रतिनिधी “म्युस” व ” ठाणे नागरी प्रतिष्ठान” (ठाणे मतदाता जागरण अभियानची मुख्य संघटना यांनी नागरिकांच्या केलेल्या पाहणीत ७९% नागरिकांनी मेट्रो ४ (कासार-वडवली ते मुंबई) ही अंडरग्राऊंड करा याचा कौल दिला आहे. मेट्रो ४ जीचे प्रत्यक्ष काम एमएमआरडीए करत आहे त्याचे स्वागत नागरिकांनी फार उत्साहाने केलेले नाही. वाहतुकीचा खोळंबा, वाढते …
Read More »भाजपच्या कोट्यातील महामंडळावरील सदस्यांची यादी जाहीर ८ महामंडळावरील सदस्यांच्या नावाची यादी प्रसिध्द
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या महामंडळावरील सदस्यांची नियुक्ती लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी ९ महामंडळावरील सदस्यांची यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली. राज्य सरकारच्या विविध महामंडळांवरील शिवसेनेच्या कोट्यातील सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या कोट्यातील सदस्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. राज्य अपंग वित्त व विकास महामंडळावर …
Read More »३ विद्यमान खासदारांसह १२ जण राष्ट्रवादीकडून रिंगणात राजू शेट्टी यांना पाठिंबा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताराचे उद्यनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. याशिवाय ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे, …
Read More »पोलिस प्रशासन शासन आदेशानुसार काम करते, दबावाखाली नाही पोलिस महासंचालक जायस्वाल यांचे प्रतिपादन
औरंगाबादः प्रतिनिधी पोलिस यंत्रणा आदेशानुसार काम करते कोणाच्याही दबावाखाली नाही.असे स्पष्टीकरण पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिले. गेल्या काही महान्यांपूर्वी ए.टी.एस आणि सी.बी.आय. ने औरंगाबादेत संयुक्त कारवाई करत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन प्रकरणी काही संशयित अटक केले होते. यावर भाष्य करतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. मराठवाड्यात निवडणूकांच्या …
Read More »पवारांच्या त्या वक्तव्यामुळे सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय …
Read More »कबड्डी लीगसाठी १८० खेळाडूंची निवड आणि लिलाव प्रक्रिया इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगची लवकरच सुरुवात
मुंबईः प्रतिनिधी भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीयस्तरावर लोकप्रियता आणि गेल्या तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या १५ ते १७ मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या संघांची अंतिम …
Read More »
Marathi e-Batmya