वाल्मिक कराडला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीः जामीनाचा मार्ग ? सीआयडीकडून चौकशी पूर्ण झाल्याची न्यायालयात माहिती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका कायद्याखाली आणि अवादा कंपनीला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला सुनावण्यात आलेली ७ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा व्हिडिओ काँन्फरंसिंग्या माध्यमातून आज बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या जामीनाचा मार्ग मोकळा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अवादा कंपनीला दोन कोटी रूपयांची खंडणीप्रकरणी सीआयडीसमोर शरण आलेल्या वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी मागील वेळी सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयात मागण्यात आली होती. मात्र आजच्या न्यायालयात कराडला हजर करण्यात आले असता वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने बीडच्या न्यायालयात दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

वाल्मिक कराडची पोलिस कोठडी संपण्याच्या एक दिवस आधीच विष्णू चाटेच्या कार्यालयात कराडसह सर्व आरोपी जातानाचे एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड, त्याबरोबर स्थानिक पीएसआय राजेश पाटील हे सर्वजण एकत्रित असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे अवादा कंपनीला ज्या दिवशी दोन कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली. त्या दिवशीचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याचा बोलले जात आहे. त्या व्हायरल सीसीटीव्ही फुटेजनंतर वाल्मिक कराड आणि इतर सात आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ होणार असल्याची अटकळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच या वेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे याचा अद्याप शोध सुरु असून त्याचा ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नसल्याने त्याला फरार म्हणून न्यायालयाने घोषित केले.

दरम्यान, काही ज्येष्ठ वकिलांच्या म्हणण्यानुसार गुन्हे कायद्यानुसार आरोपीला पोलिस कोठडी दिली. त्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली की, सदर गुन्हेगाराकडून त्याच्या जामीनासाठी अर्ज करू शकतो. त्यातच सीआयडीने वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगितल्याने वाल्मिक कराडच्या जामिन अर्जासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय, भोजशाळा-कमल मौलाना मशिद परिसर हे तर सरस्वतीचे मंदीर मुस्लिम समाजाला प्रार्थना करण्याची परवानगी देणारा आदेश रद्द करण्याचा निर्णय

विवादित धार्मिक स्थळांवर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकणाऱ्या एका निकालात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी धार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *