मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल, नौदल अधिकारी सहआरोपी का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळासाठी निविदा कोणी काढल्या?, तो पुतळा कसा उभारावा हे कोणी ठरवले? जर नौदलाने या पुतळ्यासाठी निविदा काढल्या तर जयदीप आपटे यांना कोट्यवधी रुपये देण्यापूर्वी पुतळ्याचे बांधकाम योग्य आहे की नाही याची पाहणी कोणत्या नौदल अधिकाऱ्याने केली?, ही पाहणी केल्याशिवाय पुतळ्याच्या बांधकामाचे पैसे दिले गेले का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारवर केली.

उच्च न्यायालयात जयदीप आपटेच्यावतीने युक्तीवाद करताना, आपण केवळ मूर्तीकार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा असावा त्याचे स्वरुप, आरखडा आपल्याला नौदलाकडून उपलब्ध करण्यात आले होते. त्यांच्या डिझाईननुसारच आपण पुतळ्याचे बांधकाम केल्याचा दावा जयदीप आपटेंच्या वतीने करण्यात आला. तसेच, वाऱ्यामुळे परदेशातही पुतळे पडल्याच्या घटना घडलेल्या असल्याचे न्यायालयाला सांगितले. कास्य हे हलके, स्वस्त आणि सर्व प्रकारच्या वातावरणात टिकणारे असल्यामुळे कास्यांचे पुतळे बांधले जातात, असेही जयदीप आपटे यांच्या वतीने सांगण्यात आले.

दुसरीकडे, जयदीप आपटे यांनी पुतळा उभारण्याच्या चार महिन्यातच कोसळला यावरूनच पुतळ्यातील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि पुतळ्यासाठी वापरलेला माल निकृष्ट दर्जाचा असल्याचे सिद्ध होते, असा दावा अतिरिक्त सरकारी वकील गीता मुळ्ये यांनी जयदीप आपटे यांच्या जामीनाला विरोध करताना युक्तीवाद करताना केला.

यावेळी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूजा युक्तीवाद ऐकल्यावर सवाल केला की, पुतळ्याच्या बांधकामाचे कोट्यवधी रुपये जयदीप आपटे यांना देण्यापूर्वी पुतळ्याचे बांधकाम योग्य आहे की नाही याची पाहणी कोणत्या नौदल अधिकाऱ्याने केली, ही पाहणी केल्याशिवाय पुतळ्याच्या बांधकामाचे पैसे दिले गेले का, अशी विचारणा केली. तसेच, नौदलाच्या या अधिकाऱ्याला प्रकरणात सहआरोपी केले आहे का, असा सवाल करत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

सिंधुदर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे यांनी जामिनिसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठासमोर गुरूवारी याचिकेवर सुनावणी पार पडली. तत्पूर्वी, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटेने जामिनाची मागणी करताना केला आहे. यापूर्वी, आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले असून नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली गेली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांच्या आतच या प्रकरणी तक्रार नोंदवल्याचा दावा आपटेने याचिकेत केला आहे. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते, असा दावाही केला.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *