कुर्ला बस दुर्घटना प्रकऱण: आरोपी संजय मोरेचा जामीनासाठी अर्ज पोलिसांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मागितला वेळ

कुर्ला परिसरात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अपघातामध्ये आपला कोणताही दोष नसल्याचा दावाही मोरे यांनी केला असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा अर्जातून केला आहे.

या प्रकरणावर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्या समोर मोरे यांच्या अर्जावर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. तेव्हा, सुनावणीदरम्यान पोलिसांनी अर्जावर भूमिका मांडण्यासाठी वेळ मागितला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी पुढील आठवड्यात २ जानेवारी रोजी ठेवली.

बळीचा बकरा बनविले

संजय मोरे यांना १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि इलेक्ट्रिक बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी मोरेंना जबाबदार धरता येणार नाही. अपघाताला जबाबदार असलेल्या मोठ्या माशांना सोडण्यासाठी मोरे यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे मोरे यांनी अँड. समाधान सुळे यांच्यामार्फत केलेल्या अर्जात म्हटले आहे. या प्रकरणात कोणत्याही कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा त्याला आरोपी करण्यात आलेले नाही. मोरे यांना कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांना दिंडोशी बस डेपोमध्ये इलेक्ट्रिक बस चालविण्यास सांगितली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली, त्यामुळे या दुर्घटनेला एकट्या मोरेंना जबाबदार धरता येणार नाही, असा दावाही अर्जातून केला आहे.

काय आहे प्रकरण

कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर ९ डिसेंबर रोजी रात्री इलेक्ट्रिक बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. कुर्ला – अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. वाहनाने अचानक वेग घेतला आणि वाटेत येणाऱ्या लोकांना सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४२ जण जखमी झाले. तर वीस वाहनांचे नुकसानाही झाले. या दुर्घटनेसाठी संजय मोरे या बस चालकाला ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, ११८(१), ११८(२), ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सध्या मोरे ३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

About Editor

Check Also

उच्च न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर शिक्षा स्थगितीसाठी याचिका दाखल पण न्यायालयाकडून जामीन

शासकिय कोट्यातून आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेले घर मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी देवळाली न्यायालयाने आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *