मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाचा निर्णयः सातही आरोपी निर्दोष प्रज्ञा सिंह ठाकूर कर्नल पुरोहितसह सात जणांची निर्दोष मुक्तता, नव्याने तपास करण्याचे आदेश

२००८ साली नाशिक जिल्ह्यातील मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सतरा वर्षांनंतर, मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी निकाल दिला.

एनआयए न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, सरकारी वकिलांना ‘प्रकरण सिद्ध करण्यात अपयश आले’ आणि आरोपींना ‘संशंयाचा फायदा’ मिळाला. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) तरतुदी या प्रकरणात लागू होत नाही, असेही यावेळी एनआयए न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात नमूद केले.

एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असे निरीक्षण नोंदवले की, ज्या बाईकला बॉम्ब बांधण्यात आला होता ती बाईक प्रज्ञा ठाकूरची आहे हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट होण्याच्या दोन वर्षांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संन्यासी बनल्या होत्या. घटना घडण्यापूर्वीच त्यांनी जीवनातील सर्व भौतिक गोष्टींचा त्याग केला होता, असे न्यायालयाने म्हटले आहे.

त्याचबरोबर न्यायाधीशांनी असे निरीक्षण नोंदवले की, ज्या बाईकला बॉम्ब बांधण्यात आला होता ती बाईक प्रज्ञा ठाकूरची आहे हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही.

मालेगाव स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे १७ वर्षांनी, ३१ जुलै २०२५ रोजी विशेष न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष सोडले, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरमधून आरडीएक्स मिळवून त्यांच्या निवासस्थानी बॉम्ब तयार केला होता.

२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले. आझाद नगर पोलिस ठाण्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, परंतु नंतर नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुन्हा नोंदवला आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) आरोप लागू केले.

जानेवारी २००९ मध्ये, एटीएसने पहिले आरोपपत्र दाखल केले आणि त्यानंतर एप्रिल २०११ मध्ये पूरक आरोपपत्र दाखल केले.

तथापि, एप्रिल २०११ मध्ये, गृह मंत्रालयाने स्वतःहून एनआयएला या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे निर्देश दिले.

मे २०१६ मध्ये, एनआयएने दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आणि भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरुद्ध मोक्काचे आरोप रद्द केले.

डिसेंबर २०१७ मध्ये, विशेष न्यायाधीश एस.डी. टेकाळे यांनी मोक्काचे आरोप रद्द केले आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली आरोपपत्र दाखल केले.

सर्व आरोपी सध्या जामिनावर होते. आता न्यायालयाने या सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने हे सर्व आरोपी आनंदी झाल्याचे पाह्यला मिळाले.

दरम्यान या प्रकरणी बॉम्बस्फोट प्रकरणातील जखमी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या वकीलांनी एनआयए न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *