बिगबॉसच्या घरात अंकिताने नवऱ्याचा केला अपमान अंकिताच्या अरेरावी भाषेवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे

हिंदी ‘बिग बॉस सीझन १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या घरात यंदा एक सो एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. सिंगल स्पर्धकांसोबत कपल्स देखील सहभागी झाल्याने शोची प्रसिद्धी अधिक वाढवत आहे. बाहेर बिग बॉसमध्ये एकत्र खेळायचं आणि जिंकायचं असं स्वप्न पाहून गेलेले कपल्स घरात जाताच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

तसेच त्यांची भांडणं पाहून चाहतेही नाराज होत आहेत. अशीच एक जोडी सध्या चर्चेत आली आहे ती म्हणजे टीव्ही कलाकार अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे अंकिता आणि विकी घरात मात्र भांडत आहेत. नुकतंच त्यांचं बिग बॉसच्या घरात झालेलं भांडण पाहून अंकिताचे चाहते चांगलेच नाराज झाले आहे. पण या प्रकरणावर आता भाईजान सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘बिग बॉसच्या घरात मोस्ट फेव्हरेट कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची एन्ट्री झाली तेव्हापासून चाहते त्यांची रिअल लाइफ केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक होते, पण जेव्हापासून शोमध्ये त्यांची एन्ट्री झाली तेव्हापासून त्यांच्यात फक्त भांडणच होत आहे. मागच्या झालेल्या एपिसोडमध्येही विकी जैनने अंकिता लोखंडेवर आपला राग काढला होता, त्यानंतर सोशल मीडियावर त्याला अंकिताचे चाहते प्रचंड ट्रोल करत आहेत.

विकीने अंकिताला “असा वाईट चेहरा का केलास? तुला खूप चांगलं वाटतंय का?” असं म्हणत झापलं. त्यावर अंकिताने ”मी अशीच आहे, मला अशीच सवय आहे’ असं उलट उत्तर दिलं. विकी म्हणाला, “मी तुझ्याकडे काय मागितले आहे? तू मला आयुष्यात काही देऊ शकली नाहीस, पण मन:शांती तरी दे.” घरी असता तर या व्यक्तिरेखेला इडियट म्हटले असते असेही तो म्हणाला.

अंकिताला काहीही समजावून सांगू शकत नसल्याची लाज वाटत असल्याचंही तो म्हणाला. एवढंच बोलून तो थांबला नाही तर पुढे विकी म्हणाला, ‘तुझं हे वाईट वागणं बंद कर. तुझं हे असं वागणं मी आधीही पाहिलं आहे. तुझ्या अशा वागण्यामुळे मनारासारखे मूर्ख लोक सुद्धा मला चार गोष्टी ऐकवतात. एक दिवस तुला माणसांकडून आदर मिळवण्यासाठी भीक मागावी लागेल.” अशा शब्दात विकीने अंकिताला झापलं आहे. आता अंकिताचे चाहते विकीला ट्रोल करत असतानाच सलमानने विकीला झापलं आहे.

About Marathi E Batmya

Check Also

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *