३ मे रोजी डी.वाय पाटील स्टेडियममधल्या ए. आर. रेहमान वंडरमेंट टूरच्या ग्लोबल प्रीमियरच्या निमित्त्याने मुंबईने अविस्मरणीय अद्भूत संगीत रजनी अनुभवली. या कार्यक्रमाला ४०,००० हून जास्त लोकांच्या उपस्थितीने तिला सर्वात जास्त चर्चेत राहणारी संगीत रजनी बनवले. रेडिको खेतान लि. या आयएमएफएल क्षेत्रातील सर्वात ख्यातनाम संस्थेने रामपूर डिस्टिलरी या आपल्या नावाजलेल्या नेतृत्वाखाली या कॉन्सर्टचे आयोजन केले होते.
ए. आर. रेहमान वंडरमेंटने नाद आणि दृश्याचे सुखावणारे फ्युजन सादर केले जो अभूतपूर्व व्हिज्युअल इफेक्ट्स, प्रभावी स्टोरीटेलिंग आणि प्रसिध्द पाहुणे असलेल्या कलाकारांच्या नावाजलेल्या कलाकृतींचा सुंदर मिलाफ होता. संगीत संध्येची सुरुवात ‘जय हो’च्या इलेक्ट्रिफाइंग सादरीकरणाने झाली आणि ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली, ज्यामुळे सोहळ्यात वेगळाच भावनीक उत्साह संचारला.
रेडिको खेतान लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमर सिन्हा या सोहळ्याविषयी बोलताना म्हणाले,” रामपूर डिस्टिलरी आणि ए. आर. रेहमान वंडरमेंट या दोन नावाजलेल्या नावांना एकाच भव्य मंचावर अनुभवण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. या सहयोगामुळे वारसा, सृजनशीलता आणि भारतीय सर्वोत्कृष्ठतेच्या अनंत उत्साहाला साजरे करता आले. जागतीक आकर्षणासह भारतीय सर्वोत्कृष्ठतेचा सन्मान करणा-या आमच्या ब्रॅंडच्या भावार्थाला ऊर्जा, कला आणि जादुई संध्येने खऱ्या अर्थाने जीवंत केले. संगीताच्या शक्तीमुळे अविस्मरणीय स्मृती एकत्रित, उन्नत आणि निर्माण केल्या जाऊ शकतात यावर असलेल्या आमच्या विश्वासाला या सहयोगाने खरोखरच सार्थ केले.”
शामक डावर यांच्या नृत्यरचनेने मंचावर वेगळाच जोश संचारला, ज्यामुळे ही संध्या कधीच न विसरता येऊ शकणारी संवेदी अनुभूती बनली. या सोहळ्याच्या काही ठळक बाबींमध्ये ए. आर. रेहमान यांनी मोहित चौहानसोबत सादर केलेले नादान परिंदे, सुखविंदर सिंगसोबतचे छैया छैया आणि जोनिता गांधी सोबतच्या आयकॉनिक ताल मुव्ही ट्रॅकचा समावेश असून प्रत्येक ड्यूएटला प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गडगडाटाने प्रतिसाद मिळाला.
हा सोहळा केवळ संगीत आकर्षक नसून, प्रेक्षकांच्या उत्साहाने चालना दिले गेलेले फुल-थ्रॉटल सेलिब्रेशन होते. त्यांच्या इलेक्ट्रिक सामर्थ्याने आणि प्रचंड जोशाने प्रत्येक बीट आणि नोट थरारकपणे सजीव झाल्याप्रमाणे भासत होती. संगीत रजनीची सांगता जसजशी जवळ येऊ लागली, तसे या सोहळ्याचा स्टेडियममधल्या प्रत्येकासोबत जुळलेला सूर स्पष्ट झाला तसेच संगीत, संस्कृती आणि सृजनशीलतेच्या अचूकसमन्वयाची स्मृती देखील चिरकालापर्यंत टिकून राहिल याची जाणीव झाली.
Marathi e-Batmya