परिणीती राघवच्या लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियंकाला भेटण्याचा मुहूर्त मिळाला

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. करवा चौथच्या निमित्तानं परिणितीनं आपले आणि राघव चड्ढाचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत.त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावरही तूफान लाईक्स येताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाला येऊ शकली नव्हती. नंतर मी मुंबईत मामि फेस्टिवलसाठी येऊन गेली पण तेव्हा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.

आपल्या बहिणीच्या लग्नाला न आल्यानं तिला सोशल मीडियावरती ट्रोल करण्याचा फंडा सुरू झाला होता. आता आपल्या अमेरिकेतील घरी परत जाताना तिनं आपल्या लाडक्या बहिणीची आणि जिजूची भेट घेतली सध्या त्याचे फोटो हे सर्वत्र व्हायरल झाले आहेत. यावेळी आपल्या बहीणीला मिठी मारून निरोप देताना दिसते आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या दोघींची भेट मुंबई येथे झाली. आता प्रियांका ही दिल्ली येथे रवाना झाली आहे. यावेळी प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा या दोघीही कलिना येथे मुंबई एअरपोर्ट नजीक स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. येथून त्या दोघी दिल्लीला जाणार आहेत. तिथे राघव चड्ढाशी त्या दोघींची भेट होणार आहे.

यावेळी या दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या भेटीगाठीवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. यावर्षीपासून राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांच्या फोटोंना चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे. यावेळी नेटकरीही नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

About Marathi E Batmya

Check Also

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *