शाहरूख खानने शायरी सोबत ट्विट केलेल्या फोटोला तासात ४१ हजार जणांनी केले लाईक पठाण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिलसिला चित्रपटातील तुम होती तो ऐसा होता…

मागील काही दिवसांपासून काही निवडक चित्रपटांच्या विरोधात ट्रेडिंग करून फ्लॉप करण्याचे प्रकार सुरु आहेत. या ट्रेडिंगमुळे आमिर खानचा बहुचर्चित लालसिंग चढ्ढा हा चित्रपट फ्लॉप करण्यात आला. त्यापाठोपाठ शाहरूख खान याच्या मोस्ट अवेटेड पठाण या चित्रपटाला फ्लॉप ठरविण्यासाठी काही ट्रेडिंगवाले तयारीत आहेत. मात्र शाहरूख खान आणि त्याच्या टीमकडून चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती बाहेर येवू दिली जात नाही. परंतु शाहरूख खानकडून फक्त चित्रपटाचे पोस्टर्स तर कधी त्या अनुषंगाने काही सूचक ट्विट करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने शाहरूख खान यांनी प्रेक्षकामध्ये चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशाने अमिताभ बच्चन यांच्या सिलसिला चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या त्या गाण्यातील अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील तुम होती तो ऐसा होता, तुम इस बात से हैरान होती ही शायरी शेअर केली आहे. त्याचबरोबर शाहरूख खानने त्यांच्या चित्रपटासाठी खास बॉडी बिल्डींग केले असून त्याची एक झलक दाखविणारा ढासू फोटोही त्याने ट्विट केला आहे.

त्याच्या या ट्विटला जवळपास ९ हजार पाचशे लोकांनी रिट्विट केले. ४१ हजार ९०० लोकांनी त्याला लाईकही केले आहे. तर जवळपास ३ हजार ७०० हून अधिक जणांनी कॉमेंटही केल्या आहेत.

About Editor

Check Also

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *