रणवीरची नायिका सारा कि जान्हवी? सिंम्बा चित्रपटात वर्णी लावण्यासाठी दोन अभिनेत्रींमध्ये शर्यत

मुंबई : प्रतिनिधी

आज रणवीर सिंह हे नाव सर्वांनाच चांगलं परिचयाचं आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर रणवीरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’मध्ये रणवीरचं एक अनोखं रूपच प्रेक्षकांना पाहायला मिळालं. रणवीरच्या या रूपावरही अनेक तरुणी फिदा झाल्या. सध्या झोया अख्तरच्या ‘गली बॅाय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला रणवीर आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने रणवीरसोबत ‘सिम्बा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटातील रणवीरचा फंकी लुकही रिव्हील करण्यात आला. पण यात त्याची नायिका कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरीत ठेवण्यात आलं होतं.

रोहितने ‘सिम्बा’च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे. २८ डिसेंबर २०१८ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्याचा रोहितचा मानस आहे. या चित्रपटात रणवीर एका पोलिस अधिकाऱ्याची भू्मिका साकारत असून, याचं नाव संग्राम भालेराव उर्फ सिम्बा असल्याचं फर्स्ट लुक पाहिल्यावर जाणवतं. पण या चित्रपटातील त्याची नायिका कोण? हे कोडं अद्याप कोणालाही उलगडलेलं नाही. या चित्रपटात रणवीरची नायिका बनण्याच्या शर्यतीत सध्या दोन अभिनेत्री धावत असल्याची चर्चा आहे. यापैकी एक आहे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, तर दुसरी श्रीदेवीची मुलगी जान्हवी. जान्हवी सध्या करण जोहर बनवत असलेल्या ‘सैराट’च्या हिंदी रिमेकद्वारे बॅालिवुडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे, तर सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. रोहितच्या या अॅक्शन-कॅामेडीपटात रणवीरची नायिका या दोघींपैकी कोणी बनेल की अन्य एखाद्या अभिनेत्रीची एंट्री होईल ते लवकरच समजेल.

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *