माधुरी बनली निर्माती १५ ऑगस्टच्या चित्रिकरणास लवकरच सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी

मराठी असूनही आजवर हिंदीतच रमलेली माधुरी दीक्षितनेने सध्या मराठी चित्रपटांच्या प्रेमात दिसतेय. लवकरच ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तेजस देवस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटासोबतच आणखी एका मराठी चित्रपटाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. माधुरी सध्या एका मराठी चित्रपटाची निर्मितीही करतेय.
सध्या तरी या चित्रपटाचं शीर्षक ‘१५ ऑगस्ट’ असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. आर एन एम मुव्हींग पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या चित्रपटात राहुल पेठे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटसोबतच ‘वक्रतुंड महाकाय’ आणि ‘मुंबई मेरी जान’मध्येही राहुल यापूर्वी चमकला आहे. त्याच्या जोडीला आहे मृण्मयी देशपांडे. आजवर कॅमेरा फेस केल्यानंतर आता कॅमेऱ्यामागे राहून म्हणजे चित्रपटाची निर्मिती करताना एक वेगळंच फिलींग येत असल्याचं मत माधुरीने व्यक्त केलं आहे. राहुल आणि मृण्मयी आपल्या चित्रपटाच्या कथानकाला योग्य न्याय देण्यास सक्षम असल्याचा विश्वासही माधुरीला आहे. माधुरीने नुकतंच ‘बकेट लिस्ट’चं चित्रीकरण पूर्ण केलं असून, सध्या ती ‘१५ ऑगस्ट’च्या निर्मिती प्रक्रियेत बारकाईने लक्ष देत आहे. या चित्रपटाचं शीर्षक नंतर बदलण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *