अँड ऑस्कर गोज टू ‘शेप ऑफ वॉटर’ शशी कपूर व श्रीदेवी यांना हॉलीवूडची श्रद्धांजली

लॉस एंजिल्स : प्रतिनिधी

हॉलीवुड-बॉलीवुड सोबतच  जगभरातील सिनेचाहत्यांचे लक्ष वेधुन घेणारा ९० वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज मोठ्या दिमाखात पर पडला. लॉस एंजिल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये ‘शेप ऑफ वॉटर’ या बहुचर्चित चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी दिला जाणारा ऑस्कर आपल्या नावे केला.

रेंगीबेरंगी आणि फॅशनेबल कॉस्ट्यूम परिधान करून रेड कारपेटवर वॉक करीत सिने तारकांनी उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. या सोहळ्याला जगभरातील आघाडीच्या कलाकार व मान्यवरांनी हजेरी लावली. भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार गेरी ओल्डमन यांनी ‘डार्केस्ट अव्हर’ या सिनेमासाठी व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग मिझूरी’ सिनेमासाठी फ्रान्सेस मॅकडोर्मंडनी यांनी पटकावला. ‘शेप ऑफ वॉटर्स’ या सिनेमासाठी गिलियर्मो डेल टोरो सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्काराचे मानकरी ठरले. ‘थ्री बिलबोर्ड्स’साठी अभिनेता सॅम रॉकवेलला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा, तर अॅलिसन जेने (आय, टोन्या) हिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार बहाल करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट गीत रिमेम्बर मी (कोको), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत अलेक्झांडर डेस्पाल्ट (शेप ऑफ वॉटर्स), सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर रॉजर डिकन्स (ब्लेड रनर २०४९), सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन जॉडर्न पील यांना (गेट आऊट), सर्वोत्कृष्ट पटकथा रूपांतरण जेम्स आयव्हरी (कॉल मी बॉय युवर नेम),  सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री ‘हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द ४०५’, सर्वोत्कृष्ट संकलन ‘डंकर्क’, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म ‘कोको’, सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’,  सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म ‘डिअर बास्केटबॉल’ , सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – रिचर्ड किंगस अॅलेक्स गिबसन (डंकर्क), सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ‘ब्लेड रनर २०४९’, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन ‘शेप ऑफ वॉटर’, सर्वोत्कृष्ट वेशभूषा मार्क ब्रिजेस (फॅन्टम थ्रेड). ‘इकारस’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला.

About Editor

Check Also

शाह बानो बेगमच्या वारसांनी गौतमी धार आणि इम्रान हाश्मी अभिनीत हक चित्रपटाला नोटीस हक चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिली तात्काळ स्थगिती देण्याची केली मागणी

शाह बानो बेगमच्या कायदेशीर वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की यामी गौतम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *