साकार झालं परिच स्वप्न अक्षयकुमार सोबत चित्रपट करण्याची अखेर मिळाली संधी

मुंबई : प्रतिनिधी

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, काळानुरूप ही स्वप्नं बदलत असली तरी स्वप्न साकार होण्यासारखं दुसर सुख नाही असं म्हटलं त्यात काही वावगं काही नाही. चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या तारे-तारकांचीही काही स्वप्नं असतात. यशराजच्या बॅनरखाली बनलेल्या ‘लेडीज वर्सेस रीकी बहेल’ या चित्रपटात डिंपलच्या भूमिकेत थेट रणवीर सिंहसोबत जोडी जमवत फिल्म इंडस्ट्रीत दाखल झालेल्या अभिनेत्री परिणीती चोप्राचंही एक स्वप्न साकार झालं आहे.

रणवीर सिंहनंतर अर्जुन कपूर, सुशांत सिंह राजपूत, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॅाय कपूर, आयुष्यमान खुराना यांसारख्या हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या परीला अक्षय कुमारसोबत काम करायचं होतं. यासाठी ती चांगल्या संधीच्या प्रतिक्षेत होती. नशिबाची साथ लाभल्याने अक्षयसोबत काम करण्याचं परीचं स्वप्न साकार झालं आहे. ‘केसरी’ या आगामी चित्रपटात परिणीती अक्षयसोबत दिसणार आहे. ‘केसरी’ हा पंजाबी भाषेतील चित्रपट असून अनुराग सिंह या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अक्षय पंजाबी असल्याने थेट त्याच्या मातृभाषेतील चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याने या चित्रपटाबाबत परिणीती खूप उत्साहित आहे.

About Editor

Check Also

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *