अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयातीत व्यक्तीचा फोटो जारी रात्री २.३० वाजता १२ व्या मजल्यावरून खाली उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीसोबत सैफ अली खानशी झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने सहावेळा चाकूने वार केले. यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झाला. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्ती कोठून आला, कोठे गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती १२ व्या मजल्यावरून रात्री २.३० वाजता खाली उतरताना दिसून आला. तसेच त्या अज्ञात व्यक्तीच्या हाताला जखम झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांकडून या संशयित व्यक्तीचा सीसीटीव्ही फोटो जारी केला.

या संशयित व्यक्तीला शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ७ पथके तयार करण्यात आली असून या आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. या संशयित व्यक्ती यापूर्वी १२ व्या मजल्यावर आला होता की त्याला सैफ अली खानचे घर आधीपासून माहित होते याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच मध्यरात्री या संशयित आरोपीला पाहणाऱ्या आणि त्याने हल्ला केल्यानंतर चोर चोर म्हणून आरडाओरडा करणाऱ्या सैफ अली खानच्या घरातील महिला मदतनीस लिमाचा कबुली जबाबही पोलिसांनी घेतला आहे.

तसेच हा संशयित व्यक्ती सैफ अली खानचा मुलगा तैमुर याच्या खालीत शिरला असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे हा संशयित आरोपी खरेच चोरीच्या उद्देशाने घरात शिरला होता की, सैफच्या मुलाच्या नावावरून टीकेचा विषय ठरलेल्या तैमूरला धोका पोहोचविण्यासाठी घरात घुसला होता याबाबत विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान, सैफ अली खान यास लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर सैफ अली खानच्या स्पायनल कॉर्डमधून एका धारदार वस्तूच्या टोकदार तुकडा काढण्यात आला आहे. सैफला एकूण सहा जखमा झाल्या असून यातील एक जखमी अडीच इंचाची असल्याचे सांगत दुसरी जखम इंटर मिडीयट असल्याचे लीलावतीच्या वैद्यकीय पथकाने सांगितले.

तसेच या वैद्यकीय पथकाने सांगितले की, सैफ अली खान यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच तो धोक्याच्या बाहेर आहे.

या घटनेचे वृत्त कळताच करीना कपूर हिची बहिण करिष्मा कपूर, सुप्रिया सुळे आदी जणांनी लीलावती रूग्णालयाला भेट देऊन सैफ अली खानच्या प्रकृतीची चौकशी केली. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष तथा मंत्री आशिष शेलार यांनीही सैफ अली खान याची भेट घेतल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *