‘राक्षस’मध्ये सईचा बेधडक अभिनय पत्नीच्या भूमिकेत असूनही वेगळा ठसा

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेत्री सई ताम्हणकरने नेहमीच प्रवाहपेक्षा हटके भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. मराठीत ग्लॅमर आणि बोल्डचं अचूक मिश्रण सादर करणाऱ्या सईचा ‘राक्षस’ हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सईचा बिनधास्त अभिनय मन मोहून टाकतो.

विवेक कजारीया आणि निलेश नवलाखा यांची निर्मिती असलेल्या ‘राक्षस’ची कथा शीर्षकाप्रमाणेच खूप वेगळी आहे. जंगलातील सत्य अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटात सईसोबत शरद केळकर मुख्य भूमिकेत आहे. सईने या चित्रपटात शरदची पत्नी इरावतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ब्लास्टिंग इंजीनियर असूनही पडद्यामागील सत्य जगासमोर आणण्यासाठी माहितीपट बनवण्याचा ध्यास असणाऱ्या आपल्या पतीच्या शोधत निघालेल्या पत्नीची कथा या चित्रपटात आहे. सईने ही भूमिका अगदी लीलया साकारली आहे. पुरस्कार सोहळे तसंच सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये दिसणारी सई ‘राक्षस’मध्ये अत्यंत साधेपणातही लक्ष वेधून घेते. कोणत्याही दबावाला बळी न पडता, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघर्ष करताना प्रसंगी जीवाची पर्वाही न करणारी सई या चित्रपटात दिसते.

समित कक्कड या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता असून, दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांनी केलं आहे. कथा, पटकथा व संवादलेखन ज्ञानेश यांनी तन्मयी देव यांच्या साथीने केलं आहे. ऋतुजा देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, जयेश संघवी, धनंजय सरदेशपांडे आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

 

About Editor

Check Also

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने नवी नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *