Breaking News

सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीत २०.३६ टक्के वाढ मारुती सुझुकीने सर्वाधिक लाख कार विकल्या

सप्टेंबर २०२३ मध्ये भारतातील वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर २०.३६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात १८ लाख ८२ हजार ७१ वाहनांची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १७ लाख ७० हजार १८१ वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने सोमवारी वाहन विक्री अहवाल प्रसिद्ध केला.

तीनचाकी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक ४८.५८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशभरात एकूण १ लाख २ हजार ४२६ तीनचाकी वाहनांची विक्री झाली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात ६८,९३७ तीनचाकी वाहनांची विक्री झाली होती. त्याच वेळी, व्यावसायिक विभागामध्ये वार्षिक ४.८७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशात ८०,८०४ व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. २२ सप्टेंबरमध्ये ७७,०५४ वाहनांची विक्री झाली.

प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीने सर्वाधिक १.३९ लाख कार विकल्या आहेत. यासह, मारुती सुझुकीचा बाजार हिस्सा वार्षिक आधारावर ३९.८२ टक्क्यावरून ४२.०३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने १.११ लाख कार विकल्या होत्या. मागील महिन्यात ट्रॅक्टर विक्री वार्षिक आधारावर ९.६६ टक्के कमी झाली. सप्टेंबरमध्ये एकूण ५४,४९२ ट्रॅक्टरची विक्री झाली होती, तर वर्षभरापूर्वी याच महिन्यात ६०,३२१ ट्रॅक्टरची विक्री झाली होती.

एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, श्राद्धाचा कालावधी १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्यानंतर नवरात्र सुरू होईल. एकूण ४२ दिवसांच्या उत्सव कालावधीत विक्रीबाबत आम्ही आशावादी आहोत. आम्‍हाला आशा आहे की हा सणासुदीचा हंगाम ऑटो रिटेल क्षेत्रासाठी चांगला असेल.

Check Also

जेएसडब्लूचा आयपीओ सेबीने रोखला रोखून धरण्याचे कारण स्पष्ट नाही

भांडवली बाजार नियामक सेबीने JSW सिमेंटची प्रस्तावित रु. ४,००० कोटी रुपयांची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *