राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधऩ झाल्याने राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडे अर्थ खाते असल्याने अजित पवार यांच्यानंतर अर्थ खाते कोणाकडे जाणार असा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीकडे अर्थ खाते कोणी सांभाळू शकणारे राजकीय व्यक्तीमत्व नसल्याने किमान सध्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खाते स्वतःकडे ठेवले. त्यानुसार आज अर्थसंकल्प आज दुपारी सादर करण्यात आला.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नव्या घोषणा केल्या…
मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनः उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता.
स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करणार
१० ते १५ पिकांसाठी एकत्रित मूल्य साखळी
अजित पवार यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार.
२०३० पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणार.
वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित कऱण्याचे लक्ष्य
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील तीन स्थानकाचं काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार
शहरांच्या विकासासाठी १० शहर विकास प्राधिकरण तयार करणार
परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल
मुंबई, सिंगापूर दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरु करणार
गडचिरोलीत ७० हजार रोजगाराची निर्मिती करणार
परवडणाऱ्या १० लाख नवीन घरांचा विकास आराखडा तयार केला जाणार
मुंबई-पुण्यात ३० लाखांहून अधिक रोजगाराची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न
मत्स्य व्यवसायासाठी १ हजार २४० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेत मजुरांचा समावेश करणार. त्याचबरोबर महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
२०४७ पर्यंत राज्याचा कृषी निधी ट्रिलियन डॉलर्सवर नेणार
राज्याचा कृषी जीडीपी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
किमान १ हजार लोकसंख्या असलेली गावे सिमेंटच्या रस्त्याने जोडली जाणार.
-राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी यापूर्वी समितीची स्थापना केली होती. त्या समितीच्या अहवाला नुसार दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्याशेतकऱअयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी कर्जमाफी योजना जाहिर करण्यात आली असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
५० नव्या स्टार्ट अप प्रकल्पांना थेट निधी उपलब्ध करून देणार, तसेच निविदेचे कामही थेट देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एमपीएससी मार्फत ७५ हजार नवी पद भरती करणार
३२ हजार ७५६ कोटी रूपये मुख्यमंत्री सौर ऊर्जा खर्च
लाडकी बहिण योजना यापुढेही सुरुच राहणार.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाचं काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
खेळाडूंसाठी मिशन अऍथलेटीक्स योजना सुरु करण्यात येणार आहे.
१२ खेळांचे राज्य स्तरावर केंद्र उभारणार
सायबर सुरक्षा धोरण राबविणार
साताऱ्यांच्या दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार
साताऱ्यातील कटगुणमध्ये महात्मा फुले यांच भव्य स्मारक उभारणार
मोटार वाहन करात ३० टक्के सूट देण्याची घोषणा
अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार
हिंदूहृसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम २०२६ पर्यंत पूर्ण करणार
महाड येथील चवदार तळे येथील पायाभूत सोयीसुविधांकरीता विकास आराखडा
संत गाडगेबाब उन्नत ग्राम योजना
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविस्तार एआय
ग्रामीण गरिब कुटुंबाना घरकुलांद्वारे प्रतिष्ठा
महाराष्ट्राला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविणार
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक डिजीटल व्यासपीठ
बांबू उद्योगात ५०,००० कोटीॆंची गुंतवणूक आकर्षित करून ५ लाख रोजगार निर्मिती करणार
गडचिरोली नवे स्टील हब
सेवा क्षेत्राच्या उत्पन्नात ९ ते १० पटीने वाढ
अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्टस क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल बनणार
शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन
विविध पर्यटन प्रकल्पाची कामे प्रगती पथावर
नाशिकच्या भूमिवर रामकाल पथ विकास प्रकल्प
अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई
नागपूर शहरात व्यापार व वित्तीय केंद्राचा विकास
प्रवासी व मालवाहतुकीसाठी अखंड संपर्क जाळे
विविध मेट्रो प्रकल्पांना मंजूरी
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूयारी मार्ग
Marathi e-Batmya