Breaking News

दोन कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना लाभांशाची घोषणा या दोन कंपन्यांकडून जाहिर

जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी अनेक कंपन्या रोज निकाल जाहीर करत आहेत. यामधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना आकर्षक लाभांशही देण्याची घोषणा केली आहे. आता आणखी दोन कंपन्यांनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना लाभांश जाहीर केला आहे. जिंदाल स्टेनलेस आणि रामकृष्ण फोर्जिंग्स या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देणार आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर ५० टक्क्यांपर्यंत अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

जिंदाल स्टेनलेसचा लाभांश
जिंदाल स्टेनलेसने २ रुपये दर्शनी मूल्याच्या आधारे ५० टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर १ रुपये लाभांश देणार आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख २८ ऑक्टोबर आहे. गुंतवणुकदारांना लाभांश १७ नोव्हेंबर २०२३ पूर्वी दिला जाईल. जिंदाल स्टेनलेसचा नफा दुसऱ्या तिमाहीत १२० टक्क्यांनी वाढून ७६४ कोटी रुपये झाला आहे. तर निव्वळ महसूल १२ टक्क्यांनी वाढून ९७९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

रामकृष्ण फोर्जिंगचा लाभांश
रामकृष्ण फोर्जिंगने गुरुवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेच. यावेळी २ रुपये दर्शनी मूल्याच्या आधारे ५० टक्के म्हणजेच १ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली. रामकृष्ण फोर्जिंगचा आर्थिक वर्षातील हा पहिला लाभांश आहे. कंपनीने या लाभांशाची रेकॉर्ड तारीख ३० ऑक्टोबर ठेवली आहे. लाभांश घोषित केल्यापासून १ महिन्याच्या आत दिला जाईल.

तिमाही निकाल
दुसऱ्या तिमाहीत रामकृष्ण फोर्जिंगचा एकत्रित नफा ६७ कोटी रुपयांवरून ८२ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. तर एकत्रित उत्पन्न ८५४ कोटी रुपयांवरून ९८६ कोटी रुपयांवर गेले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा १९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय, कंपनीचे मार्जिन दुसऱ्या तिमाहीत २१.२ टक्क्यांवरून २०.१ टक्क्यांपर्यंत घसरले.

Check Also

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी जलसंपदा आणि सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *