माझी लाडकी…नियोजनावरून राज्यातील बँक कर्मचाऱी संपावर १६ नोव्हंबरला राज्यातील सर्व बँक कर्मचारी संपावर

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आणि बँका यांनी कुठलेही नियोजन केले नाही, समन्वय साधला नाही परिणामस्वरूप बँकेच्या शाखातून अलोट गर्दी झाली आहे. लाभार्थी महिलांची बँकेत खाती नाही ती उघडण्यासाठी बँकातून गर्दी लोटली आहे. ज्यांची खाती आहेत ती आधारशी जोडलेली नाहीत त्यामुळे आधार कार्डासह महिला मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी करत आहेत आणि एवढे करून ज्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यातील काही पैसा ग्राहक सेवा शुल्कापोटी बँकेला देणे आहे तिकडे वळते करून घेतला जात आहे त्यामुळे बँकेच्या काउंटरवर या प्रश्नावरून ग्राहक, बँक कर्मचार्‍यांशी वितंडवाद घालत आहेत.  यामुळे निर्माण झालेला असंतोष आणि गोंधळ याचा फायदा गावोगावचे भावी आमदार स्वतःला लोकप्रियता मिळवण्यासाठी या लाडक्या बहिणींचा अनुनय करण्याचा एक मार्ग म्हणून नेमका प्रश्न समजून न घेता बँक कर्मचाऱ्यांशी भांडत आहेत, त्यांना मारहाण करत आहेत.
अशा घटना सर्वदूर राज्यात वारंवार घडून येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बँकेच्या वरुड बुद्रुक जालना शाखेत,  ३१ ऑगस्ट रोजी बँक ऑफ बडोदाच्या लोणी देवकर इंदापूर पुणे येथील शाखेत, २१ सप्टेंबर रोजी पंजाब नॅशनल बँकेच्या वाकड पुणे येथील शाखेत, २७ सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र बदनापूर जालना शाखेत, १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या
धर्मापूरी बीड शाखेत, ४ ऑक्टोबर रोजी युको बँकेच्या दौंड-पुणे शाखेत, ६ ऑक्टोबर रोजी बँक  ऑफ महाराष्ट्रच्या फुरसुंगी पुणे शाखेत, १० ऑक्टोबर रोजी बँक ऑफ बडोदा च्या वरवडि धुळे शाखेत, त्याच दिवशी सेंट्रल बँकेच्या लातूर शाखेत आणि महाराष्ट्र बँकेच्या गेवराई बाजार जालना शाखेत तर दिनांक १६ ऑक्टोबर बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी मालेगाव शाखेत समाजकंटकांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना झाल्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे पण यातील काही ठिकाणी आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही तर बहुतांश ठिकाणी आरोपींना जामिनावर सोडून देण्यात आले आहे जे पुन्हा राजरोस बँकेत कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्यातील बँक कर्मचाऱ्यांत एक भीतीचे तसेच असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे हे लक्षात घेता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन मधे सहभागी बँकिंग उद्योगातील सर्व संघटनांनी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी एक दिवसाच्या राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. संघटनांतर्फे २५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे तर १५ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यातून धरणे कार्यक्रम संघटित करण्यात येत आहे.  याशिवाय १० नोव्हेंबर रोजी ट्विटर कॅम्प तर ११ नोव्हेंबर रोजी अग्रणी बँकेच्या प्रमुखाकडे मास डेप्युटेशन, १४ नोव्हेंबर रोजी कॅण्डल लाईट मार्च असे अनेक कार्यक्रम संघटित करण्यात येत आहेत.  संघटनेच्यावतीने बँक कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, समाजकंटकांना कठोर शिक्षा देण्यात यावी व बँकातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी या तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

About Editor

Check Also

भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४४७.५५ अंकांनी म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *