अर्थविषयक

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले …

Read More »

आता व्यापाऱ्यांना एकाच राज्यात अनेक दाखले काढता येणार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी

मुंबईः प्रतिनिधी सद्यस्थितीत व्यापार-धंद्यांसाठी एका राज्यात एकच नोंदणी दाखला घेता येत असे. मात्र जीएसटी नोंदणी दाखल्याच्या तरतूदीत सुधारणा करत व्यापाऱ्यांना आता एकाच राज्यात वेगवेगळ्या व्यापार-धंद्यांसाठी वेगवेगळे नोंदणी दाखले घेता येणे शक्य होणार असून या अदिनियमातील सुधारणेस राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. याबरोबरच मूळ स्त्रोतातून कर गोळा करण्यास (टीडीएस) पात्र …

Read More »

महात्मा गांधीची खादी १५० देशांपर्यंत पोहचविणार केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने महात्मा गांधी यांच्या ‘राष्ट्रनिर्मितीसाठी खादी’ या मंत्राला ‘राष्ट्र परिवर्तनासाठी खादी’ असा मंत्र देऊन खादीला जगातील ६० देशांपर्यंत पोहचविली असून लवकरच खादी १५० देशांपर्यंत पोहचविणार असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी मुबईत मंगळवारी केले. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य …

Read More »

मेक इन इंडिया- मेक इन महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी ‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र असून यातून सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. स्टेनले स्टिल मर्चंट असोसिएशनच्या ६१ व्या वार्षिक बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, अतुल शहा …

Read More »

वित्त आयोगाकडून राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत आधी चिंता नंतर प्रशस्तीपत्रक राज्याची समाधानकारक प्रगती होत असल्याचा आयोगाला विश्वास

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे वित्त आयोगाने आपल्या प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केले. मात्र या दोन दिवसात सरकारने चांगली बडदास्त ठेवताच वित्त आयोगाला उपरती होत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून प्रगतीपथावर घौडदौड करत असल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यापेक्षा राज्याची …

Read More »

विरोधकांच्या टीकेनंतर अर्थमंत्र्यांची सारवासारव सरकार वित्त आय़ोगासमोर बाजू मांडणार असल्याची वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यानंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सारवा सारव करत अर्थशास्त्राच्या मापदंडानुसार सरकार वेतन देत आहे. कर्जावरील व्याज, निवृत्तीवेतन देत आहोत. या आणि अशाच कितीतरी बाबी आम्ही १५ व्या वित्त आयोगापुढे मांडणार आहोत. त्या मांडल्यानंतर वित्त आयोग आपल्या निष्कर्षाबाबत निश्चितच खुलासा करेल, असा विश्वास त्यांनी …

Read More »

राजकीय फायदयासाठी सरकारी पैसा वापरल्याने अर्थव्यवस्था कोलमडते आमदार जयंत पाटील यांची वित्तीय आयोगाकडे मांडली व्यथा

मुंबईः प्रतिनिधी जीएसटी कौन्सिल ही जवळपास सर्वच निर्णय राजकीय हेतूने प्रेरित होवून निवडणुका आल्या की,जीएसटीतून करांचे दर कमी करायचे असा प्रघात आज पडत आहे. पूर्वी व्हॅटची व्यवस्था असताना आम्ही सर्व राज्यांचे अर्थमंत्री एकत्र बसून त्यासंबंधी निर्णय घेत होतो मात्र सध्या जीएसटी कौन्सिलचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असल्याने विविध करांबद्दल राजकीय हेतूने …

Read More »

राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि दळवळणासाठी खास निधी द्या कॉग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय वित्त आयोगाकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय वित्त आयोगाच्या बैठकीत राज्याला केंद्राकडून मिळणा-या आर्थिक निधीबाबत काँग्रेस पक्षाचा दृष्टीकोन मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ आयोगाच्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींबरोबरच्या चर्चेच्या बैठकीत सहभागी झाले होते. आ. भाई जगताप व किशोर गजभिये हे ही यावेळी उपस्थित होते. …

Read More »

माहिती अधिकार कार्यकर्ता आणि वित्त विभागामुळे सरकराच्या तिजोरीत पैसे अखेर रिलायन्सने भरले २६०० कोटी रूपये

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे राज्य सरकारला भरणे बंधनकारक असतानाही रिलायन्सने २४०० कोटी रूपये भरले नाहीत. त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या थकबाकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला कोटीवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली . परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली आणि वित्त विभागामुळे बुडीत जाणारी २४०० …

Read More »

सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर राज्यात गुंतवणूक करणार महाराष्ट्र-क्युबेकमध्ये आर्थिक सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी आज स्वाक्षरी केली. यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या …

Read More »