पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित ससूर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

पुणे कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीच्या ब्लड सॅम्पल बदलणारे ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी हाळनोर यांच्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी निलंबनाची कारवाई केली. तर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून ससून रुग्णालयाचा शिपाई अतुल घटकांबळे यालाही निलंबित करण्यात आले.

त्याचबरोबर ब्लड सॅम्पल बदलणारे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर, आणि शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना पुराव्याशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून पोलीसांनी अटक केली असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याप्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने दोनच दिवसांपूर्वी समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

त्याचबरोबर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता व संस्थाप्रमुख म्हणून सदर प्रकरणावर योग्य ते नियंत्रण ठेवलेले नाही, त्यामुळे डॉ काळे यांना या प्रकरणात तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याची शिफारस चौकशी समितीने केली होती, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सध्या ससून रूग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अर्थात डिनचा कार्यभार डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदाचा कार्यभारही आहे.

यासंदर्भात हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले की, ब्लड सॅम्पल बदलणे ही अतिशय गंभीरबाब आहे. यापुढे कुठल्याही सरकारी रुग्णालयात अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून योग्य ती कारवाई करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यानुसार समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बदल्या-पदोन्नती करताना एसएचआरसीच्या मूल्यांकनानुसार कार्यवाही करा आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *