२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत.

पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात जवळपास १४ हजार ५०४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १३ हजार ७३८ रूग्णांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर शनिवारी २४ तासात १४५ नव्या रूग्णांचे निदान झाले होते.

About Editor

Check Also

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *