रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी करा ‘हे’ ४ नैसर्गिक उपाय रक्तदाब कसे नियंत्रित करावे वाचा सविस्तर वृत्त

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली असून शंभरातील प्रत्येकी दहा व्यक्तीला हा आजार असतो. उच्च रक्तदाबाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली, तणाव या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला हानी पोहोचते तसेच शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा धोका पोहचतो.

तसेच उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. मात्र, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. जर दबाव वाढला तर उच्च रक्तदाब होतो आणि जर दबाव कमी झाला तर कमी रक्तदाबाची तक्रार निर्माण होते. मात्र, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.

१. लसूण

लसूण उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तुम्ही दररोज सकाळी लसणाचे सेवन करू शकता. याचे सेवन करण्याचे इतर अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

२. कॅफीनचे प्रमाण कमी करा

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर कॅफिनचे सेवन कमी करा. यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये काम करताना कॉफी आणि चहा पितात. यामुळे शरीरात चपळता येते. कॉफी प्यायल्यानंतर पूर्ण उर्जा जाणवते. तज्ञांच्या मते, दिवसातून एक ते दोन कप कॉफी पिणे फायदेशीर आहे.

३. भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. अभ्यासानुसार, त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. जर तुम्हाला कमी रक्तदाब असेल तर भोपळ्याच्या बिया आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. व्यायाम करा

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे जरुरी आहे. व्यायामामुळे केवळ उच्च रक्तदाब नियंत्रित होत नाही तर हे हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून ३० ते ४५ मिनिटे व्यायाम केला पाहिजे. याशिवाय ताण नियंत्रणात ठेवावा. तणावामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.

( टीप :सदर लेखामध्ये दिलेली माहिती उपयुक्त असली तरी आपल्या उच्च रक्तदाब तक्रारी संबंधात डॉक्टरांचा वेळोवेळी योग्य सल्ला घ्या)

About Marathi E Batmya

Check Also

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *