राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग केंद्र सुरू करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांची माहिती

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर केली.

नॅशनल स्पोर्टस् क्लब, वरळी येथील डोम सभागृह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने २१जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वसुधैव कुटुंबकम् साठी योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गिरिष महाजन म्हणाले,आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस हा आरोग्यापासून लांब होत चालला आहे. कोरोना सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे एवढे तर नक्की झाले आहे की, जर आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहीत व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ २१ जून २०१५ रोजी जगभरात साजरा करण्यात आला. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब ठरली. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेमुळे आज ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे.जगातील १५० हून जास्त देश योग साधना करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जग आपल्यालाकडे आदर्श नजरेने पाहात आहे. मोदींनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे देश सुपर पावर होण्याच्या मार्गावर आहे. विकसित व सर्वश्रेष्ठ राष्ट्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचा निर्णय, ‘सेवाखंड क्षमापित’ आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होणार

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या अस्थायी सेवाकाळातील ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *