एमपीएससीने मुलाखती पुढे ढकलल्या आता ३० ऑगस्टला होणार मुलाखती

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०१४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत. महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले होते.

एमपीएससी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहे. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव (सरळ सेवा – निकाल) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

About Editor

Check Also

मुंबई महानगरातील रुग्णालयांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेत सहभाग घ्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *