रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी गैरहजर राहील्यास थेट निलंबन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सार्वजनिक रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात किंवा पूर्व कल्पना न देता गैरहजर राहतात. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नागरी सेवा कायद्यांतर्गंत शिस्तपालनाची आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सार्वजनिक रूग्णालय विभागाने एका आदेशान्वये सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.

मागील काही दिवसांपासून क्षेत्रिय कार्यालयात, जिल्हा रूग्णालयात अनेक अधिकारी-कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता निघून जातात, तर काहीजण किंवा मुख्यालय सोडताना वरिष्ठांची पूर्व परवनागी घेत नाहीत. याशिवाय अनेक अधिकारी दौऱ्यावर जातानाही परवानगी घेत नाहीत, विदेश दौरेही करतात, अशा पध्दतीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असल्याची बाब निदर्शनास येत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय अनेक अधिकारी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकांनाही सबळ पुराव्याअभावीही गैरहजर रहात असल्याचे आढळून येत असल्याने अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती त्या त्या विभागीय कार्यालयांना वेळोवेळी कळवावी असे आदेशही सार्वजनिक विभागाच्यावतीने सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

संबधित कर्मचारी, अधिकाऱ्याचे वर्तन हे अशा पध्दतीचे असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर एका महिन्याच्या आत निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करा आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *