कोल्हापूरातील १० वर्षाचा मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त

मागील काही दिवसात महाविद्यालयीन युवकांमध्ये अथवा नवतरूणांमध्ये सातत्याने शाररीक आणि मानसिक तणावामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणीच थकवा किंवा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त कानावर पडते. यामागे बदलती जीवनशैली आणि शाररीक कमतरतेला जबाबदार धरण्यात येत आहे. परंतु कोल्हापूरातील एका १० वर्षिय मुलाचा खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि घरी जाताच त्यांने त्यांच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला. परंतु आईच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतल्याची घटना घडली.

वास्तविक पाहता ग्रामीण पातळीवर किंवा निमशहरी भागातील लहान मुलांच्या आरोग्याकडे नेमक्या कोणत्या पद्धतीने लक्ष द्यावे असा प्रश्न सध्या पालकांपुढे निर्माण झाला आहे. राज्यातील काँलेज युवक-युवतींच्या मध्यंतरी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमातच मृत्यूने गाठल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांनंतर नवयुवक-युवतीच्या आरोग्याची काळजी कशा घ्यावी किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारसमोरही प्रश्न आहे.

असे असताना मात्र कोल्हापूरातील एका १० वर्षाच्या मुलाचा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका १० वर्षाच्या मुलाचा खेळताना कोसळून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पीडित श्रावण अजित गावडे हा गुरुवारी संध्याकाळी इतर मुलांसोबत गणपती मंडळात खेळत असताना अचानक अस्वस्थता जाणवू लागली.

श्रावण घरी गेला आणि त्याच्या आईच्या मांडीवर झोपला, जिथे त्याने शेवटचा श्वास घेतला.

मुलाच्या अनपेक्षित मृत्यूमुळे संपूर्ण गावात आणि आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

“श्रावण खेळकर आणि मित्रत्व जपणारा होता,” असे त्याचे काका गजानन गावडे म्हणाले.

पीडितेचे वडील अजित गावडे यांना दोन मुले होती, एक मुलगा श्रावण आणि एक मुलगी. चार वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचे निधन झाले आणि आता, त्यांच्या मुलाच्या मृत्यूने, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

About Editor

Check Also

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *