विद्यार्थी आंदोलनामागचा “हिदूस्थानी भाऊ” कोण? जाणून घेवू या या व्यक्तीबाबत

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईसह राज्यात १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑफलाईन घ्या किंवा परिक्षा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आणि नागपूर, उस्मानाबादसह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांना आंदोलन करायला भाग पाडणारा व्यक्ती म्हणून “हिंदूस्थानी भाऊ” या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. मात्र हा हिदूस्थानी भाऊ म्हणवून घेणाऱ्या हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अंधेरी येथील विकास जयराम फाटक नावाचा व्यक्ती आहे.

समाजात अशांतता निर्माण करणारे व्हिडिओ युट्युबवर प्रसारीत करणे, व्हिडिओत प्रशोभक भाषा वापरणे, भारत-पाकिस्तानबाबत व्हिडिओ सातत्याने मुन्नाभाई स्टाईलमध्ये बनवित असतो. बिग बॉसच्या १३ व्या भागात वाईल्ड कार्डद्वारे या हिंदूस्थानी भाऊला प्रवेशही मिळाला होता. त्याच्या युट्युबला ४५० हजार सबस्क्राईबर आहेत.

त्याने तयार केलेले अनेक व्हिडिओ हे प्रक्षोभक असल्याने यु ट्युबने सुध्दा त्याच्या अनेक व्हिडीओवर बंदी घालत ते काढून टाकले आहेत.

मुंबई पोलिसचे डिसीपी प्रणय अशोक यांनीही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास फाटक हा असल्याची माहिती दिली आहे.

पहिल्या लॉकडाऊनच्या काळातही एका अशाच व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक परप्रांतीय कामगार वांद्रे स्टेशनवर जमा झाले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात चांगलेच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यावेळीही त्या गर्दी जमा होण्यामागे विकास नामक व्यक्तीचा व्हिडिओ असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. आताच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास हेच नाव पुढे येत आहे. त्यामुळे तो विकास आणि आताचा विकास फाटक हा एकच तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे.

दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. त्यामुळे या मागचा नेमका हिंदूस्थानी भाऊ आपल्या खऱ्या नावासह समोर येईल.

हिंदूस्थानी भाऊची अशीही माहिती https://yourwikis.com/hindustani-bhau/

About Editor

Check Also

मुंबईत मेट्रोच्या पिलर्सचा भाग कोसळून अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी कारचे नुकसान, नुकसान आणि अपघाताची नुकसान भरपाई एमएमआरडीए देणार

मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा एक भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *