बिल्डर सुशील रहेजा प्रकरण- वंचितच्या कार्यकर्त्यांची अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारले 'वंचित बहुजन आघाडी'च्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका !

मुंबईत राहुल जाधव या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा आरोपी बिल्डर सुशील रहेजा विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजा अद्याप मोकळा असताना, दुसरीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याने खळबळ माजली होती.

सुशील रहेजाने त्याच्याकडे कामाला असलेल्या राहुल जाधव यांना “तुम जयभीम वाले गंदे लोग, तुम साले घाटी, सुधरेंगे नही” म्हणत भर ऑफिसमध्ये मारहाण केली होती. या प्रकरणी आरोपी सुशील रहेजावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला पोलिसांनी अटक केली नाहीये.

काल रात्री पोलिसांनी वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई आणि इतरांना बिल्डर रहेजाचे ऑफिस तोडफोड प्रकरणी अटक केली होती. आज त्यांना भोईवाडा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका न्यायालयाने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे की, एखाद्या गुन्ह्यामध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यात आरोपींना नोटीस देणे बंधनकारक असते. त्या गुन्ह्यात जर आरोपी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत असेल तर त्याला अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे कायदा सांगतो. मुंबई पोलिसांनी कुठलीही नोटीस न देता थेट अटक केली होती.

मुंबई पोलिसांनी बिल्डर रहेजा आणि राजकीय पक्षांच्या दबावाखाली हे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीच्या ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही ‘अर्थ’ नाही व ‘संकल्प’ही नाही बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार

मुंबई महानगरपालिकेच्या ८० हजार ९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही व कोणताही संकल्प नाही असा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *