राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील.

मुख्य सचिव अजोय मेहता हे १९८४ च्या बँचचे आएएएस अधिकारी असून ३१ मार्च २०२०  रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र या आपातकालीन परिस्थितीत त्यांच्या जागी नव्या सचिवांची नियुक्ती करणे अशक्य असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवत त्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने या प्रस्तावास मान्यता दिली.

 

About Editor

Check Also

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *