माझी मराठा समाजाच्या मुलांना हात जोडून एकच विनंती असून तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्या नंतर तुमच्या घरच्यांना कोण बघणार, जर तुम्हीच नसाल तर या आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल करत मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो असे म्हणत (मंचावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत) या एकनाथ शिंदेचा शब्द आहे की माझ्या शरीरात रक्त असे पर्यंत मराठ्यांना आरक्षणासाठी लढत राहणार हा एकनाथ शिंदे याचा शब्द आहे अशी जाहिर घोषणा केली.
आझाद मैदानालगत असलेल्या क्रॉस मैदानावर शिंदे गटाचा आज दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना उद्यापासून मराठा आरक्षणप्रश्नी समाजाचे आंदोलन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तिकडे शिवाजी पार्कवरील दावा सोडल्यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी विचारलं की, आपण शिवाजी पार्कवरील दावा सोडायला नको होता. आपला दसरा मेळावा तिथेच व्हायला हवा होता. पण मी त्यावेळी सांगितलं आपल्या सोबत बाळासाहेबांचे विचार आहेत जेथे आपल्या त्यांच्यासोबत विचार आहेत तेच आपले शिवतीर्थ असा उल्लेख करत आपणावर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. वाटलं असतं तर तेथेच दसरा मेळावा घेतला असता पण राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शिवतीर्थाचा दावा सोडल्याचा खुलासाही केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्या सभेत नेहमीप्रमाणे मोदी द्वेष आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलावरील टीका तसेच आमच्यासोबत आलेल्या आमदार खासदारांवर गद्दार म्हणून टीका इतकेच काय ते सुरु असते. स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. की ज्या दिवशी माझी काँग्रेस होण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन. पण त्यांचा वारसा सांगणारे त्याच काँग्रेससोबत गेले असून आमच्यावर दोन फूल एक हाफची टीका करणारे एक फुल एक हाफ म्हणणारे आता काँग्रेसचे तळवे चाटत आहेत. एमआयएमबरोबर युती करत आहेत. समाजवाद्यांच्या पाया पडत आहेत अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर करत तिकडे टोमणे सभा सुरु असेल असा उपरोधिक टोलाही लगावला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ मराठा आरक्षण कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण ठेवत म्हणाले, कोणाच्याही आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार असे निर्धारपूर्वक सांगत माझ्या शरीरातील शेवटच्या थेंबापर्यंत मराठा आऱक्षणासाठी लढत राहणार असल्याचे सांगत मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ नव्हे मी त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतो असे सांगत प्रत्यक्ष कृती करून दाखवित मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशी घोषणाही केली.
२४-१०-२०२३ 📍आझाद मैदान, मुंबई शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा https://t.co/qgQWpg1zu0
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 24, 2023
Marathi e-Batmya