क्रेडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे..! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते.

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्याचे आम्ही शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण केले असून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासाकाकडून बांधून घेणे त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान १०० खाटांचे अद्यावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनल सारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासाकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यवसायिक क्षेत्र विकसित करता येईल. अशा पध्दतीचे सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रीडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत असे आवाहन यावेळी केले.

याप्रसंगी क्रेडाई चे अध्यक्ष डॉमनिक रोमेल (Domnic Romell) व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *