पोलिस सायबरमध्ये इंटर्नशीप करायचीय मग या ईमेल वर बायोडेटा पाठवा महाराष्ट्र सायबर विभागाकडून अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सायबर विभाग पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे १२-८-२०२० पर्यंत पाठवावा.

यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center,

Cuffe Parade, Mumbai-400 005

इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.

इंटर्नशीपचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही.  (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)

महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.

महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.

महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.

कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत.

असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

रामदास आठवले यांचे निर्देश, महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात चैत्यभूमी परिसरासाठी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *