mumbai rain: मुंबईतील जनजीवन विस्कळीतः लोकल, रेल्वे पुर्वपदावर नाही ३०० मिमी पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, अद्याप पाणी पूर्ण ओसारायला तयार नाही

मध्यरात्रीनंतर उशीराने सुरु झालेल्या मुसळधार पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत राहिला. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला. सकाळचे ११ वाजले तरी साचलेले पाणी कमी व्हायला तयार नव्हते. यामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी वेळेवर घराच्या बाहेर पडूनही लोकलने आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत.

रात्रीपासून सकाळपर्यंत पडलेल्या पावसामुळे मुंबईतील लोकसेवेबरोबरच रस्ते महामार्गही पाण्याखाली आले. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या एक्सप्रेस, मेल मध्येच अडकल्या. विशेषतः घाटकोपर, भांडूप मुलुंड, कुर्ला आदी भागात पावसाचे पाणी चांगलेच तुंबुंन राहिले. त्यामुळे रेल्वे आणि लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र अनेक रेल्वे ट्रॅकवर दिसून येत होते.

त्याचबरोबर मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल्याने रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होते. तर जवळपास लोकलने आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कामानिमित्त मुंबई बाहेर जाणाऱ्यांसाठी स्टेशनवर प्रवाशी स्थानकात थांबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र पाह्यला मिळत होते.

या पावसाच्या पाण्याच्या फटका विदर्भ एकस्प्रेसला बसला असून राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्रॅकवर उतरून चालत कुर्ला स्टेशन पर्यंत पायी पोहचले.

तसेच अनेक रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. तर लोकल सेवा अद्यापही सीएसटीएम आणि ठाणे दरम्यानच चालविण्यात येत असली तरी ती अद्याप काहीशी विस्कळीत आहे. साधारणतः लोकलसेवा जर ३० ते ३५ मिनिटांच्या उशीराने चालविली जात आहे. ठाणे स्थानकाच्या पुढे अद्याप ट्रेन सेवा पुरेशी सुरु झाल्याचे दिसून येत नाही.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून आणि राज्य सरकारच्या प्रशासनाकडून गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काहीकाळ थांबलेला पाऊस दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने रेल्वे सेवा आणखी काही काळ रखडलेल्या अवस्थेत राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरातील अनेक शाळा, महाविद्यालयांना राज्य सरकारने सुट्टी जाहिर केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *