अदानीने केलेली वीज दरवाढ मुंबईकरांचा खिसा रिकामा करणार महागाईच्या आगडोंबात मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचा फटका

मुंबईकर उन्हाच्या तडाख्याचा सामना करत असताना अदानी कंपनीने केलेल्या वीज दरवाढीमुळे मुंबईकरांना जोरदार झटका बसणार आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने होणारी दरवाढ म्हणजे ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जात असून उन्हात होरपळणाऱ्या मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. अदानीने ही वीज दरवाढ कमी करून स्वस्त दरात वीज मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभागाचे मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

अदानी पॉवरने त्यांचे वीजदर वाढवले असून मुंबईकरांना या वाढीव वीज बिलाचा त्रास होणार आहे. झोपडपट्टीत राहणारे गरीब, कष्टकरी जनतेसह मध्यमवर्गीय कुटुंबालाही या वीज दरवाढीची झळ बसणार आहे. मुंबईतील तापमानातही वाढ होत असल्याने पंखे, एसी, कुलर यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात केलेल्या या दरवाढीचा सर्वसामान्यांना शॉक बसला आहे. अदानीच्या या वीज दरवाढीचा मुंबईतील ३० लाख लोकांना फटका बसणार आहे, याआधी टाटा पॉवरनेही विज दर वाढवले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या काळात महागाईने जनतेचे जगणे कठीण करुन ठेवले आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे आणि खाजगीकरणामुळे सरकारचे त्यांच्यावर नियंत्रण नाही. या सर्व प्रकारात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. सरकारने यात लक्ष घालून सामान्य मुंबईकरांची या दरवाढीतून सुटका करावी असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीच्या ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही ‘अर्थ’ नाही व ‘संकल्प’ही नाही बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार

मुंबई महानगरपालिकेच्या ८० हजार ९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही व कोणताही संकल्प नाही असा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *