माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला त्याच्याच एका क्रिकेट फॅनने केले रूग्णालयात दाखल ठाण्यातील आकृती हॉस्पीटलमध्ये विनोद कांबळीला केले अॅडमिट

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली होती. विनोद कांबळी याने त्याच्या व्याह्यात गोष्टी सोडून द्याव्यात असा सल्ला त्याचा मित्र सचिन तेंडूलकर आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी विनोद कांबळी यास जाहिरपणे दिला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत विनोद कांबळी याने पुर्नवसन केंद्रात दाखल होण्याची तयारीही दाखविली. त्यास काही दिवस लोटत नाहीत तोच विनोद कांबळी याच्या प्रकृत्ती बिघडायला लागली आणि प्रकृत्ती ढासळायला सुरुवात झाल्याने विनोद कांबळी यांच्या क्रिकेटचा एका फॅन विनोद कांबळी यास त्याच्याच ठाणे येथील आकृती रूग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले.

दरम्यान २१ डिसेंबर रोजी पासून विनोद कांबळी याची तब्येत ढासळायला लागल्याने त्याचा फॅन असलेला आणि आकृत्ती रूग्णालयाच्या मालकाने विनोद कांबळी याला रूग्णालयात दाखल केले. विनोद कांबळी याच्या तब्येतीत आता सुधारत आहे. आज विनोद कांबळी यास प्रसारमाध्यमांसमोर आणत आले. त्यावेळी विनोद कांबळी म्हणाले की, मी क्रिकेट कधीच सोडणार नाही. तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या बळावर आज जीवंत असल्याची भावनाही व्यक्त केली.

विनोद कांबळी याच्यावरील उपचाराची आणि आर्थिक मदतीची जबाबदारी आकृती रूग्णालयाच्या मालकाने घेतली आहे. परंतु विनोद कांबळी यास नेमक्या कोणत्या कारणामुळे आणि त्याला कोणता आजार झाला याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *