होमगार्ड पदाकरिता मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर २ हजार ५४९ पुरुष व महिला होमगार्डच्या रिक्त पदासाठी भरती

होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या २ हजार ५४९ पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता २ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

होमगार्ड बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण २ हजार २४७ अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तसेच मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

About Editor

Check Also

सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई

आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *