वाहनधारकांना मोठा दिलासा: अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत.

अ क्र वाहनांचा प्रकार                                   शिवडी ते गव्हाण   शिवडी ते शिवाजीनगर   शिवाजी नगर ते गव्हाण
१  मोटर,     जीप,   व्हँन,   हलके  मोटार वाहन  २५० रु.      २०० रू. ५० रू.
२ हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस  ४०० रु,  ३२०रु,   ८० रु
३ ट्रक अथवा बस ( दोन आसांचे)  ८३०रु,  ६५५ रु,  १७० रू.
४ तीन आसांचे व्यावसायिक वाहन ९०५ रु,  ७१५ रु, १८५ रु.
५ अवजड बांधकाम यंत्रसामग्री, जमीन खोदाई यंत्रसामग्री, अधिक आसांचे वाहन  १३०० रु, १०३० रु , २७० रु
६ अति अवजड वाहन, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन १५०० रु,  १२५५ रु,  ३२५ रु.

 

About Editor

Check Also

जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने; अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण

जनगणना हा विकास नियोजनाचा भक्कम पाया आहे. जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *