Breaking News

एमएमआरडीएची कोट्यावधींची रक्कम थकविणाऱ्या हॉटेलात अमित शहांचा मुक्काम ३१.८२ कोटी सोफीटेल हॉटेलने थकविल्याची माहिती माहिती अधिकारात उघड

मुंबई : प्रतिनिधी

वेळेत काम पूर्ण न करणा-या श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडच्या सोफिटेल हॉटेलचे अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी याआधी एमएमआरडीएने नाकारलेली होती. त्यानंतर हफ्ता-हफ्ताने रक्कम अदा करण्याचे मान्य करताच एमएमआरडीएने परवानगी दिली. पण श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडने शब्दाला न जागत पुढचा हफ्ताच भरला नसल्यामुळे या घडीला ३१. ८२ कोटी रूपये थकीत असल्याची माहिती माहिती उघडकीस आली असून हे पैसे भरण्याऐवजी एमएमआरडीएलाच कोर्टात सोफिटेलने खेचले आहे. विशेष म्हणजे पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षच या हॉटेलात थांबणार असल्याने सरकारी संस्थेला खड्ड्यात घालणाऱ्या हॉटेलच का निवडले असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी केला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड ( सोफिटेल हॉटेल ) बाबत माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस दिलेल्या कागदपत्रांवरुन आज पावेतो ३१ कोटी ८२ लाख ३१ हजार ९७५ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर येत आहे. बीकेसी येथील जी ब्लॉक मधील सी-५७ आणि सी-५८ असे २ भूखंड श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड यांस ४०९.२० कोटीचे मूल्य घेत लीजवर दिले. ४ वर्षात बांधकाम पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडला २०.४६ कोटी आणि १ कोटी ६ लाख ५० हजार ४११ असे एकूण २१ कोटी ५२ लाख ५० हजार ४११ इतके अतिरिक्त प्रीमियम अदा करणे आवश्यक होते. ११ ऑक्टोबर २०११ रोजी एमएमआरडीए प्रशासनाने भोगवटा प्रमाणपत्र देताना जोपर्यंत अतिरिक्त प्रीमियम अदा केले जात नाही तोपर्यंत हॉटेल सुरु करण्यास मज्जाव केला होता. पण १५ फेब्रुवारी २०१२ रोजी संपत कुमार जे एमएमआरडीए प्रशासनाच्या नगर व क्षेत्र नियोजन विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी ५ हफ्ताची सूट देत हॉटेल पूर्वीच्या पत्रास स्वतः बदल केला. गेल्या ५६ महिन्यात श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडने फक्त २ हफ्ते अदा करत ८ कोटी ७६ लाख २८ हजार १०० रुपये एमएमआरडीएच्या तिजोरीत भरले. आजघडीला श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड कडून व्याजासह ३१ कोटी ८२ लाख ३१ हजार ९७५ रुपये येणे बाकी आहे आणि हॉटेल सुद्धा जोरात सुरु असल्याचे अनिल गलगली यांनी सांगितले.

अनिल गलगली यांच्या मते पैसे भरत नसल्यास ताबडतोब भोगवटा प्रमाणपत्र रद्द करत एमएमआरडीए प्रशासनाने सोफिटेल हॉटेल सील करण्याची गरज आहे. तसेच एमएमआरडीए प्रशासनास दिलेले अंधाधुंद अधिकाराची समीक्षा मुख्यमंत्र्यांनी आता करण्याची गरज असल्याचे मत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. परंतु एमएमआरडीए अधिकारी वर्गाचे लागेबांधे असल्यामुळे कारवाईस विलंब झाला आणि नमन हॉटेलने एमएमआरडीए प्रशासनाला कोर्टात खेचण्याची हिंमत दाखविली. अश्या थकबाकीदार हॉटेलमध्ये अमित शाह सारख्या भाजपा प्रमुखांनी राहणे अयोग्य का? असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *