अखेर हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानुसार वादळीवाऱ्यासह मान्सूनच्या पावसाने पुण्याला झोडपलं. पाऊस इतका जोराचा झाला की या पावसात पुण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तर अनेक मार्गावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्रही पाह्यला मिळाले. या मान्सूनच्या पहिल्याच पावसामुळे जवळपास १५ झाडं उन्मळून पडल्याचे पाह्यला मिळाले.
पावसामुळे जिकडे तिकडे पाणी साचल्याने डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रोड, कर्वेनगर रस्ता, नगर रस्ता, धानोरी, विमान नगर, सोलापूर आणि सातारा रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. तर पुण्याच्या विविध अशा १५ ते १६ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने त्या भागात वाहतूक कोंडी झाली. झाडे पडल्याचे वृत्त हाती येताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत झाड्याच्या फांद्या बाजूला हटविण्याचे काम सुरु केले.
Marathi e-Batmya