राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या सना मलिक-शेख अणुशक्तीनगरमधून लढणार… लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अनुशक्ती नगरमधून विद्यमान आमदार नवाब मलिक हे प्रतिनिधित्व करत होते. आता नवाब मलिक यांच्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक-शेख या आता उमेदवारी अर्ज भरत निवडणूकीला सामोरे जाणार आहेत.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ त्यांची मुलगी सना मलिक – शेख हिच्यासाठी सोडला आहे. वडिलांनी बांधलेला हा अभेद्य गड पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी सना मलिक – शेख या गेली पाच वर्षे काम करत असल्याचे बोलले जात आहे.

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर न डगमगता सना मलिक – शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात काम सुरूच ठेवले होते. आज त्याच मतदारसंघातून सना मलिक – शेख या आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *