म्हणे उद्योगपतींनी काय कँमेरेवाल्यांची पाठ पहायची का? मँग्नेटीक महाराष्ट्र उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फक्त दूरदर्शन, एएनआयवरच

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र कन्वर्जन्स-२०१८ चे उद्घाटन उद्या रविवारी १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावरील उद्योगपती हजर राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाला खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना परवानगी दिली. तर त्यांचे प्रतिनिधी व कँमेरामन सर्वात पुढे राहतील आणि परिणामी त्यांची पाठच अनेक उद्योपतींना पहावी लागणार असल्याचे अजब कारण पुढे करत खाजगी दूरचित्रवाणींना परवानगी नाकारल्याची बाब उघडकीस आली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच राज्यातील जनतेच्या दृष्टीनेही मँग्नेटीक महाराष्ट्र हा कार्यक्रम महत्वाचा आहे. मात्र सदर कार्यक्रमाचे वार्तांकन करायला खाजगी दूरचित्रवाणींना परवानगी दिल्यास त्यांच्या प्रतिनिधींची संख्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहणाऱ्या उद्योगपतींना उद्घाटनाचा सोहळा पाहता येणार नसल्याने खाजगी दूरचित्रवाहीन्यांना थेट प्रक्षेपण आणि वार्तांकन करण्याची परवानगीच नाकारली आहे. विशेष म्हणजे ही परवानगी दूसरे तिसरे नाही तर एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन फोर्सने दिलेले कारण असल्याची माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने दिली.

मँग्नेटीक महाराष्ट्रच्या उद्घाटन सोहळ्याच्या वार्तांकनासाठी सुरुवातीला याच एसपीजीने परवानगी दिली होती. मात्र उद्योगपतींच्या मान-सन्मानाचा मुद्दा उपस्थित झाल्याने खाजगी दूरचित्रवाहीन्यांना नंतर परवानगी नाकारली. त्यामुळे उद्या रविवारी सर्वांना दूरदर्शनवरच्या थेट प्रक्षेपणावर आणि एएनआय या खाजगी न्युज सर्व्हीस सेवेवर अवलंबून रहावे लागणार आहे.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *