मागील काही वर्षात मुंबईतील राजकिय आणि मराठी बाणा टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेपासून वेगळे झालेले राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मनसे समर्थक आणि शिवसेना समर्थकांनी अनेक वेळा मोर्चे काढले. पण राजकिय दृष्ट्या एकत्र येऊ न शकलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अखेर मोर्चाच्या निमित्ताने नाही पण राज ठाकरे यांच्या भाचाच्या लग्नानिमित्त एकत्र आल्याचे चित्र आज पाह्यला मिळाले.
झाले असे की राज ठाकरे यांचे पत्नी कडील नातेवाईक असलेल्या आणि भाचाचे लग्न आज पार पडणार होते. त्यामुळे या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले आहे का किंवा उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार का असा सवाल अनेक मनसे आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांसह राजकिय क्षेत्रातील मंडळीना पडला होता. मात्र मुहूर्ताच्या वेळी उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसह लग्नस्थळी पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रेश्मी ठाकरे या ही सोबत होते. त्यावेळी राज ठाकरे हे लग्न कार्यात काही काळ व्यस्थ राहिल्याने सुरुवातीला या दोन नेते आणि भावांची भेट होऊ शकली नाही.
परंतु अक्षता टाकण्याच्या काही वेळ आधी मनसे राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या तिघांनी मिळूनच नव दांमप्त्यांवर अक्षता टाकत शुभार्शिवाद दिले.
विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेच यावेळी बोलत होते. तेथे रश्मी ठाकरे या ही राज ठाकरे यांना काही सांगण्यासाठी पोहोचल्या. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठी असलेल्या रश्मी ठाकरे यांना पुढे येऊन सांगण्यास सांगितले.
या तिघांना एकत्र पाहुन दोन भावांमध्ये राजकिय वैर वगळता कोणतेही वितुष्ट असल्याचे जाणवत नव्हते. तसेच त्यांच्या कौटुंबिक जिव्हाळा अद्याप कायम असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे राजकारण वेगळे आणि कोटुंबिक नाते वेगळे याचे भान अद्याप महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना आल्याचे दिसून येत नाही.
महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और मनसे प्रमुख राज ठाकरे एक निजी कार्यक्रम में साथ दिखाई दिए। pic.twitter.com/rlCQ1ZvQCU
— Lutyens Media (@LutyensMediaIN) December 22, 2024
Marathi e-Batmya