बदलापूरात दिवाळी निमित्त लक्ष्मी पूजनात वरूणराजाने पाणी फेरले लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने उत्साहावर परिणाम

दिवाळी सणाचा आज तिसरा दिवस प्रथेप्रमाणे आज दिवाळीचे लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यामुळे सकाळपासूनच नागरिक आणि व्यावसायिकांकडून लक्ष्मी पूजनाची तयारी सुरु केली. परंतु आकाशातील वरूण राजाने बदालापूरात अचानक हजेरी लावत नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले. पावसाच्या या अचानक आगमनामुळे नागरिकांनी त्यांच्या घरासमोर अंगणात काढलेल्या रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ली व कंदील भिजले व फटाके फोडण्याचा आनंदही ओला झाला. मात्र खरेदीसाठी गेलेल्या बाजारत गेलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

सकाळपासून सर्वच ठिकाणी उत्साहाचे वातावरण होते. दिवाळीच्या निमित्ताने घराघरात स्वच्छतेची लगबग, सजावट, रांगोळ्या आणि दिव्यांची आरास केलेले अंगण अशी रंगत दिसून येत होती. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची तयारी सुरु झाल्यानंतर अचानक हवामानात बदल झाला आणि वीजाचा कडकडाट, गार वाऱ्याच्या झुळका आणि अवकाळी पावसाने अनेकांचे नियोजन विस्कळीत करून टाकले.

या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने बदलापूरसह आसपासच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावर पाणी साचले, बाजार पेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेक जणांना खरेदी केलेले सामान घेऊन आसरा शोधावा लागला. किल्ले, रांगोळ्या, कंदील आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने मुलांचाही हिरमोड झाला. अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने मुलांनी किल्ले बांधणीसाठी घेतलेली मेहनत पाण्यात गेली.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *